हिंदी, तमिळ आणि तेलुगू या तीन भाषांध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितली आहे. सेन्सॉर बोर्डाने पाच बदलांसह सिनोला यू/ए सर्टिफिकेट दिले आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलांना हा सिनेमा पाहता येणार नाही. 'पद्मावत' हा देशातला पहिला सिनेमा आहे जो आयमॅक्स 3डी हिंदीध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच सेन्सॉर बोर्डाच्या आदेशानुसार, निर्मात्यांना सिनेमाचे नाव बदलण्यास सांगण्यात आले होते. यानंतरच निर्मात्यांनी 'पद्मावती' हे नाव बदलून 'पद्मावत' केले.