करण जोहरने त्याच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त एका भव्य पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत त्याने बॉलीवूड इंडस्ट्रीतील आपल्या खास मित्रांना बोलावले आणि प्रत्येकाने त्याचा दिवस संस्मरणीय बनवण्यात कोणतीही कसर सोडली नाही. सलमान खान, रणबीर कपूर, हृतिक रोशन, कियारा अडवाणी, आयुष्मान खुराना, कतरिना कैफ, विकी कौशल यांच्यासह अनेक बॉलिवूड स्टार्सनी या पार्टीला हजेरी लावली. या पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्याचबरोबर पार्टीत पोहोचलेल्या स्टार्सच्या स्टाईल आणि ड्रेसवरही लोक आपली मते मांडत आहेत. करण जोहरच्या 50 व्या बर्थडे पार्टीत पोहोचलेल्या जान्हवी कपूर आणि मलायका अरोरा त्यांच्या ड्रेसमुळे सतत लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
जान्हवी कपूरला करण जोहरने बॉलिवूडमध्ये लॉन्च केले होते आणि ती त्याच्यासाठी खूप खास आहे. करणच्या वाढदिवसाच्या पार्टीत जान्हवीचा आनंद पाहायला मिळत होता. या पार्टीत ती चमकदार ड्रेसमध्ये दिसली पण अनेक प्रसंगी ती अस्वस्थही झाली. या पार्टीचे काही फोटो समोर आले आहेत, ज्यावरून हे स्पष्ट झाले आहे की जान्हवी देखील या चमकदार ड्रेसमुळे ओप्स मोमेंटची शिकार झाली आहे.