सर्बियाचा टेनिस स्टार नोवाक जोकोविच याच्या एक्स गर्लफ्रेन्डने प्रसारमाध्यमांसमोर एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिच्या म्हणण्यानुसार, अभिनेत्री दीपिका पादुकोन आणि जोकोविच यांचे अफेअर सुरू आहे. त्यामुळे दीपिकाच्या चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. हे दोघे ऐकमेकांना डेट करत असल्याचा दावा जोकोविचच्या एक्स गर्लफ्रेन्डने केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून जोकोविच आणि त्याची पत्नी जेलिना यांच्यात सगळे काही ठिक नाही, अशा बातम्या आल्या होत्या. त्यात गेल्या वर्षी दीपिका आणि जोकोविच लॉस अँजेलिस येथे एका हॉटेलमध्ये डिनर डेटवर गेल्याचीही माहिती समोर आली होती. दोघे हॉटेलमधून बाहेर आल्यानंतर एकाच कारमधून जाताना दिसल्यामुळे आता जोकोविचच्या एक्स गर्लफेंडने हा खुलासा केल्याने या दोघांच्या अफेअरची चर्चा जोरात रंगली आहे.