एका टीव्ही चॅनलशी बोलताना त्या म्हणाल्या, "काली देवीचे अनेक रुपं आहेत. माझ्यासाठी काली देवी मांसाहार करणारी आणि दारूचा स्वीकार करणारी आहे. जर तुम्ही तारापीठात गेलात आणि तिथे आजूबाजूला पहाल तर तुम्हाला साधू लोक सिगारेट ओढताना दिसतील. मला वाटतं हिंदू धर्मात राहताना, काली मातेची पूजा करणारी मी हव्या त्या स्वीकार करण्याची मुभा मला मिळावी. हे माझं स्वतंत्र्य आहे आणि त्यामुळे कोणाच्या भावना दुखावतील असं मला वाटत नाही."
तुम्ही तुमच्या देवाला कशा पद्धतीने पाहता यावर सगळं अवलंबून आहे असं त्यांचं मत आहे. उदा. तुम्ही भूतानला जाता, सिक्कीमला जाता आणि तिथे लोक सकाळी पूजा करतात आणि देवाला दारूचा नैवेद्य दाखवतात. उत्तर प्रदेशात काही ठिकाणी याबद्दल सांगितलं तर तुम्ही ईशनिंदा केल्याचा आरोप तुमच्यावर लागतो. असंही त्या पुढे म्हणाल्या.