नसीरुद्दीन शाहांनी अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा विजय साजरा करणाऱ्या भारतीय मुस्लिमांना चांगलेच सुनावलं

गुरूवार, 2 सप्टेंबर 2021 (11:19 IST)
नसीरुद्दीन शाह यांनी अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवट साजरे करणाऱ्या मुस्लिमांच्या एका वर्गाला इशारा दिला आहे की त्यांना जुन्या बर्बरतेने जगायचे आहे किंवा त्यांच्या धर्मामध्ये सुधारणा करायची आहे. ते असेही म्हणाले की भारतातील इस्लाम जगभरातील इस्लामपेक्षा नेहमीच वेगळा आहे.
 
ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी अफगाणिस्तानात तालिबानच्या सत्तेत पुनरागमन साजरा करणाऱ्या भारतीय मुस्लिमांच्या एका वर्गाला खतरनाक म्हणत निषेध केला आहे. नसीरुद्दीन शाह यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, अफगाणिस्तानात तालिबानचे सत्तेत परत येणे ही संपूर्ण जगासाठी चिंतेची बाब आहे, परंतु भारतीय मुस्लिमांच्या काही वर्गाकडून रानटी उत्सव साजरा करणे हे काही कमी धोकादायक नाही.  71 वर्षीय अभिनेते म्हणाले की, तालिबानच्या पुनरुत्थानाचा उत्सव साजरा करणाऱ्यांनी स्वतःला विचारले पाहिजे की त्यांना त्यांच्या धर्मामध्ये सुधारणा करायची आहे की जुन्या बर्बरतेने जगायचे आहे.
 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by The Maharashtra News (@the_maharashtranews)

त्यांनी "हिंदुस्तानी इस्लाम" आणि जगाच्या इतर भागांमध्ये पाळला जात असल्यात अंतर असल्याचं सांगितलं. मी हिंदुस्तानी मुस्लिम आहे असेही नसीरुद्दीन शाह म्हणाले. मिर्झा गालिबने म्हटल्याप्रमाणे, अल्लाह मियांशी माझे नाते खूप वेगळे आहे, मला राजकीय धर्माची गरज नाही. भारतातील इस्लाम हा जगातील इस्लामपेक्षा नेहमीच वेगळा आहे. खुदा अशी वेळ आणू नये की त्यात इतका बदल होईल की आपण देखील त्याला ओळखू शकणार नाही. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती