मिसेस सीएम यांचा ‘फिर से’ म्युझिक व्हिडिओ लाँच

गुरूवार, 1 जून 2017 (16:58 IST)

मिसेस सीएम अमृता फडणवीस यांनी बिग बी अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत ‘फिर से’ अल्बमचा म्युझिक व्हिडिओ लाँच केला. अमृता फडणवीस यांना गायनाची आवड असून, त्यांचा हा पहिलाच म्युझिक व्हिडीओ आहे. पण अमिताभ बच्चन स्वतः या व्हिडीओमध्ये झळकले असल्याने पहिल्या दिवसापासून या व्हिडीओ अल्बम विषयी उत्सुकता होती. अमिताभ बच्चन यांच्या मुख्य उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात कोरिओग्राफर अहमद खान आणि टि सिरीजचे भुषण कुमार यांच्यासह मोजक्या पाहुण्याची उपस्थिती होती.

वेबदुनिया वर वाचा