बी.आर. चोप्रा यांच्या " महाभारत" मध्ये कर्णाची भूमिका साकारून घराघरात नाव मिळवलेले अभिनेते पंकज धीर यांचे निधन झाले .. पंकज यांचे बुधवारी (15 ऑक्टोबर) सकाळी 11:30 वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांना धक्का बसला आहे. त्यांचे अंत्यसंस्कार मुंबईतील विलेपार्ले येथे सायंकाळी 4:30 वाजता होणार आहेत.