‘पाताल लोक’ वादाच्या भोवऱ्यात; अनुष्का शर्माला कायेदशीर नोटीस

गुरूवार, 21 मे 2020 (19:15 IST)
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माची पहिलीवहिली वेब सीरिज ‘पाताल लोक’ चर्चेत आहे. अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित ही सीरिज प्रेक्षकांना पसंत पडत असली तरी आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. कारण लॉयर गिल्ड मेंबर वीरेन सिंह गुरुंग यांनी सीरिजची निर्माती अनुष्का शर्माला कायेदशीर नोटीस बजावलं आहे. 
 
या नोटीसीमध्ये जातीवाचक शब्दांचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या शब्दांच्या वापरामुळे नेपाळी समुदायाचा अपमान झाल्याचे म्हटले आहे. अनुष्काला पाठवण्यात आलेल्या नोटीसवर तिने अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही. तसेच गोरखा सुमदायने जातीवाचक शब्द वापरल्यामुळे नाराजी व्यक्ती केली आहे आणि हा शब्द सीरिजमधून काढून टाकण्यात यावा अशी मागणी केली आहे. 
 
18 मे रोजी या विरोधात ऑनलाइन पेटीशन दाखल करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या पेटीशनमध्ये सीरिजमधील हा शब्द म्यूट करण्यात यावा आणि सबटायटलमध्ये ब्लर करण्याची मागणी केली जात आहे.
 
‘पाताल लोक’ ही वेब सीरिज 15 मे पासून अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाली आहे. लॉकडाऊनच्या या काळात या थ्रीलर क्राईम सीरिजला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती