छपाक: खरा आरोपी नदीम, नाव बदलून राजेश ठेवल्यामुळे वाद, क्रेडिट न मिळाल्यामुळे वकीलही नाराज
गुरूवार, 9 जानेवारी 2020 (11:53 IST)
आता 'छपाक' चित्रपट एका वेगळ्याच कारणामुळं पुन्हा चर्चेत आला आहे. या चित्रपटाची रिलीज रोखण्यासाठी दिल्लीच्या पटियाला हाउस कोर्टात पिटीशन दाखर करण्यात आली आाहे. ही याचिका अॅसिड अटॅक सर्वाइवर लक्ष्मी अग्रवाल यांच्या वकील अपर्णा भट्ट यांनी दाखल केली आहे.
याचिकेत अपर्णा भट्ट यांनी म्हटले की त्यांनी हे प्रकरण कितीतरी वर्ष हातळलं तरी चित्रपटात त्यांना क्रेडिट देण्यात आले नाही. अपर्णा यांनी म्हटले की त्यांनी 'छपाक' चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये देखील खूप मदत केली होती.
तसेच या चित्रपटातील खलनायकाच्या नावावर सोशल मीडियावर जोरदार चर्चा होती. यात आरोपी नदीमचं नाव राजेश केल्यामुळे दीपिका पादुकोण आणि मेकर्सचं सोशल मीडियावर विरोध करण्यात आला होता.
ट्विटरवर 'राजेश' आणि 'नदीम' नाव ट्रेंड होत होते. नंतर ही चूक दुरस्त केल्याची माहिती देखील देण्यात आली.
तसेच दीपिका पादुकोण जेएनयूमध्ये गेल्यामुळे देखील सोशल मीडियावर वाद झाला होता. या विरोधात #boycottchhapaak ट्विटरवर टॉप ट्रेंड बनलं होतं.
मेघना गुलजार दिग्दर्शित छपाक चित्रपट 10 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.