लता मंगेशकर यांना लहान बहीण मानायचे संगीतकार खय्याम

मुंबई- मागील दहा दिवसापासून सुजय रुग्णालय, जुहू येथे उपचार घेत असलेले महान संगीतकार खय्याम साहेब आता आमच्या नाही. सोमवार रात्री 9.30 वाजता त्यांनी आपल्या वयाच्या 92 वर्षी आपले डोळे कायमचे बंद केले. त्यांच्या निधनाची बातमी कळल्यावर पंतप्रधान नरेन्द्र मोदी ते सुर सम्राज्ञी लता मंगेशकर सर्व दु:खी आहे. लता ताई आणि खय्याम यांच्यात तर भाऊ-बहिणी सारखं नातं होतं. लता मंगेशकर यांनी आपलं सोशल मीडियाद्वारे दु:ख व्यक्त करत लिहिले की...
 
'महान संगीतकार आणि अत्यंत सुस्वभावी व्यक्तिमत्त्व खय्याम साहेब आज आमच्यात नाही, हे ऐकून केवढे वाईट वाटत आहे ते व्यक्त करणे कठिण आहे. खय्याम यांच्यासोबत संगीताच्या एका युगाचा अंत झाला आहे. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पित करते.'
 
लताजी यांनी पुढे लिहिले- 'खय्याम साहेब मला आपली लहान बहीण समजायचे. ते माझ्यासाठी स्वत:च्या पसंतीचे गाणे तयार करायचे. त्यांच्या सोबत काम करायला आवडायचं आणि थोडी भीती देखील वाटायची कारण ते अत्यंत परफेक्शनिस्ट होते. त्यांची शायरीची समज देखील कमालीची होती.'
 
त्या लिहितात- 'म्हणूनच मीर तौकी मीर सारख्या महान शायरची शायरी त्यांनी सिनेमात आणली. दिखाई दिए यूं... सारखी खूबसूरत गजल असो वा अपने आप रातों में सारखे गीत, खय्याम साहेबांचे संगीत नेहमी हृदयात शिरतात. 'राग पहाडी' त्यांचा आवडता राग होता.'
 
लताजी ट्विटरवर लिहितात- 'आज कितीतरी गोष्टी आठवत आहे. ते गाणे, रेकॉर्डिंग्स आठवत आहे. असे संगीतकार बहुतेक पुन्हा होणार नाही. मी त्यांना आणि त्यांच्या संगीताला वंदन करते.'

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती