'डान्स'मधून कॅटरिना बाहेर

शुक्रवार, 4 जानेवारी 2019 (00:34 IST)
रोमे डिसोझाचा आगामी 'डान्स' सिनेमा कॅटरिनाने सोडून दिला आहे. 'भारत'च्या अत्यंत बिझी शेड्यूलमुळे तिने 'डान्स' सोडून दिला असल्याचे समजते आहे. या सिनेमाचे  नाव सध्या तरी 'एबीसी3डी' असे ठेवले गेले होते. कॅटरिना खूप प्रोफेशनल आहे. तिला आपल्या कामाला योग्य न्याय द्यायला नेहमीच आवडते. 'भारत'मुळे 'डान्स'ला ती योग्य न्याय देऊ शकणार नाही, हे तिच्या लक्षात आल्यामुळेच तिने हा सिनेमा सोडण्याचा निर्णय घेतला, असे तिच्या प्रवक्त्याने सांगितले. 'एबीसी3डी' हा नृत्यावर आधारित सर्वात मोठा सिनेमा ठरणार आहे. त्यामध्ये वरुण धवन आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर प्रभुदेवासह धर्मेश येलांडे, राघव जुयाल आणि पुनीत पाठकही असणार आहेत. सध्या तरी कॅटरिनाने आपले सर्व लक्ष सलानबरोबरच्या 'भारत'वर केंद्रित केले आहे. प्रियांका चोप्राने 'भारत'सोडल्यामुळे हा सिनेमा कॅटरिनाच्या पदरी पडला आहे. दक्षिण कोरियाच्या 'ऑड टू माय फादर'चा हिंदी रिमेक अतुल अग्रिहोत्रीच्या रील लाईफ प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड आणि भूषण कुमारच्या टी सिरीजद्वारे केला जातो आहे.  'भारत'चा रिलीज पुढच्या वर्षी म्हणजे 2019 च्या ईदच्यामुहूर्तावर होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती