कन्यादान केलेल्या भावासोबतच माझ्या पत्नीचं लफडं’,अभिनेता करण

शुक्रवार, 5 ऑगस्ट 2022 (14:49 IST)
अभिनेता करण मेहरा आणि अभिनेत्री निशा रावल या पती-पत्नीमधील वाद दिवसेंदिवस विकोपाला जाताना दिसत आहेत. आता तर करण मेहरा याने निशा रावल हिच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. निशा हिचे विवाहबाह्य संबंध आहेत. आणि ज्याच्याशी तिचे संबंध आहेत तो तिचा मानलेला भाऊ असून त्यानेच तिचे कन्यादानही केले असल्याचे त्याचे म्हणणे आहे. त्याच्या या आरोपांमुळे मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
 
निशा रावल हिने गेल्याच वर्षी पती आणि अभिनेता करण रावल याच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. तेंव्हापासून या दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यातच करण मेहराच्या नवीन आरोपांनी खळबळ उडवून दिली आहे. निशाचे तिच्या मानलेल्या भावासोबत संबंध असल्याचा आरोप त्याने केला आहे. तसेच आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे त्याने म्हटले आहे.  मुंबईत त्याने पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी तो बोलत होता. आपल्यालाच नव्हे तर आपल्या कुटुंबियांच्या जीवालाही धोका असल्याचे त्याचे म्हणणे आहे.
 
रोहित साटिया याच्यासोबत निशा माझ्याच घरात राहते. ही गोष्ट तिच्या घरच्यांनाही माहीत आहे. हा रोहित साटिया तिचा मानलेला भाऊ असल्याचे जरी ती सांगत असली तरी तिचे त्याच्यासोबत अफेअर असल्याचेही करणचे म्हणणे आहे. रोहितचेही लग्न झाले असून त्याला एक मुलगी आहे. तर निशा गेली चौदा वर्षे रोहितला राखी बांधत असल्याचे करण सांगतो.
 
गेल्या अनेक महिन्यांपासून मी निशाविरुद्ध पुरावे गोळा करतो आहे. रोहितची परिस्थिती चांगली नसल्याने माझी प्रॉपर्टी बळकवण्याचा निशाचा डाव आहे. त्यामुळेच ती अबला नारी असल्याचे सोंग घेत आहे, असेही करण याचे म्हणणे आहे. माझा व्यवसाय, दोन गाड्या आणि घर हडपल्याचा आरोपही त्याने निशावर केला आहे. तो पुढे म्हणाला की, रोहितला धूम्रपान, मद्यपानाची सवय असून माझा मुलगा अशा व्यक्तीसोबत रहात असल्याने मला चिंता वाटते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती