सचिनची बायोपिक झेलणे कठीण: खान

कमाल आर खान याचा नावाजलेल्या व्यक्तींना दूषण लावणे हा जन्मसिद्ध हक्कच बनला असून काही दिवसांपूर्वी त्याने राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते मोहनलाल यांची खिल्ली उडवली होती. तर बाहुबली २ चित्रपटाचे अभिनेते प्रभास आणि राणा डग्गुबत्ती यांच्याविरोधात भाष्य केले होते. कमालने या सगळ्यांमध्ये आमिर खानच्या दंगल चित्रपटातील फातिमा सना शेखला ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ चित्रपटात का घेतले? असा प्रश्न उपस्थित केला होता. आता त्याने आपला मोर्चा सचिन तेंडुलकरकडे वळवला असून सचिनच्या आत्मचरित्रपटावर भाष्य करताना केआरकेने म्हटले की, जुन्या व्हिडिओंनी हा चित्रपट बनवलेला चित्रपट आहे. पण माझ्यासाठी हा चित्रपट झेलणे कठीण आहे.

 
हे या चित्रपटाच्या ट्रेलरमध्येच स्पष्ट झाले होते की एमएस धोनीच्या चित्रपटासारखा हा चित्रपट नसणार. पण तो मात्र धोनी आणि तेंडुलकर यांच्या चित्रपटांची तुलनाच करत आहे. एका मागोमाग एक असे अनेक ट्विट त्याने केले आणि सचिन: अ बिलियन ड्रिम्स चित्रपटाला धोनीच्या चित्रपटापेक्षा ४० ते ५० टक्क्यांनी जास्त स्क्रीन्स मिळाल्यामुळे पहिल्या दिवशी हा चित्रपटा ९ ते १० कोटी रुपयांचा गल्ला कमावू शकतो. तर सुशांतमुळे धोनी चित्रपटाची कमाई नाही तर स्वतः धोनीमुळे झाली होती. ‘राबता’ चित्रपटाचे यश हे सुशांतचे असेल. त्याचे स्टारडम या चित्रपटावेळी कळेल.
 
सचिनच्या चित्रपटावर टीप्पणी करताना स्वघोषित समीक्षक म्हणून कमाल म्हणाला की, कोणाच्याही जीवनपटापेक्षा माझ्या आयुष्यावर बनवलेला चित्रपट अधिक रंजक असेल. कारण यात पुरेपुर मसाला असेल. सेक्स, गुन्हेगारी, प्रेम, व्यवसाय, बॉलिवूड अशा अनेक गोष्टींचा भरणा यात असेल.

वेबदुनिया वर वाचा