बॉलीवूडचे प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ (केके) यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या प्राथमिक निष्कर्षावरून त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बुधवारी ही माहिती देताना एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, संगीत कार्यक्रमानंतर केके मंगळवारी रात्री हॉटेलमध्ये पोहोचले होते आणि अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अहवालात असेही म्हटले आहे की गायकाला "दीर्घकाळापासून हृदयविकाराचा त्रास" होता.
"प्राथमिक अहवालात असे सूचित होते की गायकाचा मृत्यू हृदयाच्या स्नायूंमध्ये रक्त प्रवाह रोखल्यामुळे झाला. त्यांच्या मृत्यूमागे कोणतेही षडयंत्र नव्हते. तपासात असेही आढळून आले की गायकाला दीर्घकाळापासून हृदयविकाराचा त्रास होता. तपासाचा भाग म्हणून अधिकाऱ्यांनी हॉटेल अधिकाऱ्यांशी बोलून सीसीटीव्ही फुटेज तपासले.
केकेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. ज्यामध्ये गायक केके छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर रुग्णालयात नेण्यापूर्वी कोलकाता येथील हॉटेलच्या कॉरिडॉरमध्ये फिरताना दिसत आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह मुंबईत आणण्यात आला आहे दुसरीकडे, गायक केके यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमनंतर मुंबईत आणण्यात आला आहे.