‘गोल्ड’ च्या निमित्ताने पहिलाच बॉलिवूडपट सौदीत दाखवणार

शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018 (15:20 IST)
सौदी अरेबियात प्रदर्शित होणारा ‘गोल्ड’ हा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला आहे. नुकतंच अक्षयनं ट्विट करत ही खुशखबर आपल्या चाहत्यांना दिली आहे. गेल्या ३५ वर्षांपासून सौदीत चित्रपटगृहांवर बंदी होती. एप्रिल महिन्यात ही बंदी उठवल्याचं जाहीर करण्यात आलं. सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी चित्रपटगृहांवरची बंदी उठवली. १९७० मध्ये सौदीत काही चित्रपटगृह होते, पण त्यावेळी इस्लामी कट्टरपंथींच्या दबावामुळे देशभरात चित्रपटांवर बंदी घालण्यात आली होती. त्यावेळी चित्रपटांमुळे सांस्कृतिक आणि धार्मिक ओळख बिघडली जाते असा आरोप कट्टरपंथीयांनी केला आणि याच आधारे त्यांनी चित्रपटगृहांवर बंदी घातली होती.
 
मात्र आता ही बंदी उठवल्यानं जगभरातील विविध चित्रपटांसाठी नवी दारं खुली झाली आहेत. बंदी उठवल्यानंतर ‘ब्लॅक पँथर’ हा पहिला हॉलिवूड चित्रपट तिथे प्रदर्शित झाला. ३० ऑगस्टरोजी ‘गोल्ड’ सौदीमध्ये प्रदर्शित झाला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती