कॉफी विथ करण शोमध्ये महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि सलामीवीर लोकेश राहुल यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. सुप्रिम कोर्टाने नेमलेल्या प्रशासकीय समितीने(CoA) पांड्या आणि राहुल वरील बंदी तत्काळ मागे घेतली आहे. दरम्यान, ५ फेब्रुवारी रोजी या प्रकरणावर सुप्रिम कोर्टात सुनावणी होणार आहे.