लोकप्रिय आसामी गायक झुबीन गर्ग यांचा सिंगापूरमधील सेंट जॉन्स बेटावरील पाण्यात पोहताना मृत्यू झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुरुवातीला असा दावा करण्यात आला होता की त्यांचा मृत्यू स्कूबा डायव्हिंग करताना झाला होता, परंतु आता पोलिसांनी स्पष्ट केले आहे की ते पोहताना बुडाले.
सिंगापूर पोलिस दलाने (एसपीएफ) झुबीन गर्ग यांचा शवविच्छेदन अहवाल आणि प्राथमिक तपासातील निष्कर्ष भारतीय उच्चायुक्तालयाला सादर केले आहे. या प्रकरणात खून किंवा गुन्हेगारी हिंसाचाराचा कोणताही संशय नसल्याचे पोलिसांनी यापूर्वी स्पष्ट केले होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जुबिन गर्ग यांना १९ सप्टेंबर रोजी पाण्यातून बेशुद्धावस्थेत बाहेर काढण्यात आले आणि त्यांना ताबडतोब सिंगापूर जनरल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, जिथे त्यांचा मृत्यू झाला.