मिळालेल्या माहितीनुसार सनोज मिश्रावर एका लहान शहरातून आलेल्या आणि चित्रपट उद्योगात करिअर करण्याचा निर्धार करणाऱ्या मुलीशी वारंवार लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. तसेच महाकुंभ मेळ्यात मणी विकताना सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मोनालिसाला दिग्दर्शक सनोज मिश्रा त्यांच्या पुढच्या चित्रपट 'द डायरी ऑफ २०२५' मध्ये तिला कास्ट करणार असल्याची बातमी मिळाली होती. यासोबतच, असेही म्हटले जात होते की सनोज मिश्रा मोनालिसाला अभिनयाचे प्रशिक्षण देत होते आणि तो तिला अनेक ठिकाणी घेऊन जात होता. अलिकडेच मोनालिसा सनोज मिश्रासोबत विमानात दिसली होती. यानंतर खूप चर्चा सुरु होत्या.