ऐश्वर्याच्या लेकीच्या लूकवर चाहते फिदा

मंगळवार, 5 मार्च 2024 (12:41 IST)
गुजरातमधील जामनगरमध्ये अनंत अंबानींचा प्री-वेडिंग सोहळा उत्साहात साजरा झाला. एक हजारपेक्षा जास्त पाहुणे या भव्य सोहळ्यात जगभरातून निमंत्रित केले गेले होते. तसेच बच्चन कुटुंब देखील या सोहळ्यात हजर झाले होते. अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, आराध्या बच्चन, श्वेता बच्चन, नंदा आणि मुले अगस्त्य व नव्या नवेली हे देखील हजर होते. ऐश्वर्या रायच्या लेकिन यांत सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले. 
 
बच्चन कुटुंबाची लाडकी लेक आराध्या बच्चन हिच्या सुंदर अश्या लूकने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले. राधिका मर्चट व अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग सोहळ्याला ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यासोबत आराध्या देखील आली होती. हेयर स्टाइल, मेकअप, वेगळ्या लुक मध्ये अराध्या सुंदर दिसली. आराध्याने लाइट गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता. 
 
तसेच ऐश्वर्या रायचा हात धरून आराध्या कार्यक्रमात एंट्री करतांना दिसली. यावेळी ऐश्वर्या राय आणि तिची मुलगी आराध्या ह्या आई-मुली खूप सुंदर दिसत असल्याचे पाहायला मिळाले. आराध्याचा नविन लुक चाहत्यांना खूप आवडला. तसेच सोशल मीडियावर आराध्या बच्चन ही लोकप्रिय आहे. आराध्याची लोकप्रियता एवढी आहे की ऐश्वर्या राय पेक्षा चाहत्यांना आराध्याचे फोटो आवडता आणि आराध्या बच्चनवर नेहमी प्रेमाचा वर्षाव होत असतो. आराध्या ही जशी तिचे आई-वडील ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची लाडकी आहे तशीच ती चाहत्यांची देखील लाडकी आहे. 
 
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती