राजकुमार संतोषीला दोन वेगवेगळ्या चेक बाऊन्स प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवले आहे. राजकुमार संतोषी यांनी तक्रारदाराला एकूण 22.5 लाख रुपये दोन महिन्यांत परत करावेत, असे न केल्यास त्यांना एक वर्ष तुरुंगात घालवावे लागेल, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
राजकुमार संतोषी यांनी अनिल जेठानी यांच्याकडून व्यवसाय करण्यासाठी कर्ज घेतले होते. या संदर्भात त्यांनी त्यांना तीन धनादेश दिले होते, त्यांची एकूण किंमत 22.50 लाख रुपये होती. मात्र तिन्ही धनादेश बँकेत जमा केले असता पैशांअभावी ते बाऊन्स झाले. त्यानंतर तक्रारदाराने आपल्या वकिलामार्फत याप्रकरणी राजकुमार संतोषीविरुद्ध गुन्हा दाखल केला. राजकोट न्यायालयात राजकुमार संतोषीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.