यंदाच्या वर्षी अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले. पण काही मोजक्याच चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. काही हीट सिनेमे पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहात गर्दी केली. तर काही चाहते आपल्या आवडत्या सेलिब्रिटीची एक झलक पाहण्यासाठी चित्रपटगृहात पोहोचले. बॉलिवूडच्या काही अभिनेत्रींचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. सिनेमा हिट ठरल्यामुळे अभिनेत्रींच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली. यंदाच्या वर्षी बॉलिवूडच्या काही अभिनेत्रींना चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळाले.
अदा शर्मा : द केरला स्टोरी सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली. सिनेमा चाहत्यांच्या पसंतीस देखील उतरला. सिनेमाच्या कमाईबद्दल सांगायचे झाले तर, सिनेमाने ३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली. सिनेमामुळे अदा शर्मा हिच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली.
दीपिका पदुकोण :
वर्षाच्या सुरुवातीला पठाण सिनेमातील भगव्या बिकिनीमुळे दीपिका वादाच्या भोव-यात अडकली होती. पण पठाण सिनेमाने फक्त भारतात नाही तर, जगभरात नवीन विक्रम रचले. पठाणनंतर जवान सिनेमात देखील दीपिका झळकली. दोन्ही सिनेमांमध्ये दीपिका हिने शाहरूख खानसोबत स्क्रीन शेअर केली.
अभिनेत्री अमिषा पटेल :
एक काळ असा होता, जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्री अमिषा पटेल हिच्या सौंदर्याची चर्चा रंगली होती. दरम्यान, ती गदर २ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली आणि पुन्हा अमिषा पटेल हिच्या नावाची चर्चा रंगू लागली. सोशल मीडियावर देखील अमिषा कायम सक्रिय असते.