सापाच्या विष प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीने एल्विशला नोटीस बजावली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गुन्हा गौतम बुद्ध नगर पोलिसांनी नोंदवला होता. ईडीने 8 जुलै रोजी एल्विशला पहिल्यांदा बोलावले. पण युट्युबरने तो परदेशात असून त्याला काही दिवसांचा वेळ हवा असल्याचे सांगितले होते.
ईडीच्या लखनौ युनिटने एल्विश यादवला 23 जुलै रोजी परदेशातून परतल्यानंतर लगेच हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. 8 जुलै रोजी ईडीने एल्विश यादवचा जवळचा सहकारी आणि हरियाणातील गायक राहुल यादव उर्फ फाजिलपुरिया याची सुमारे 7 तास चौकशी केली होती. राहुलला त्याच्या एका गाण्यात सापाचा वापर केल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.