निया शर्मा, क्रिस्टल डिसूझा आणि करण वाही हे टेलिव्हिजन स्टार्स अडचणीत सापडले आहेत. रिपोर्टनुसार, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणात या स्टार्सना समन्स बजावले आहे.ईडीने निया शर्मा, क्रिस्टल डिसूझा आणि करण वाही यांना समन्स बजावले आहे.
तपास यंत्रणेने बुधवारी, 3 जुलै रोजी त्याची चौकशी केली. वृत्तानुसार, ऑक्टा एफएक्स ट्रेडिंग सॉफ्टवेअर आणि OctaFX.com सह विदेशी ब्रोकर्सद्वारे अवैध ऑनलाइन फॉरेक्स ट्रेडिंगशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात त्यांची चौकशी केली जात आहे. एप्रिलमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने या प्रकरणी मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि दिल्लीतील अनेक ठिकाणी छापे टाकले होते. आता त्यांनी याप्रकरणी कारवाई केली असून जबाब नोंदवत आहेत.
करण 'दिल मिल गए' आणि 'चन्ना मेरेया' सारख्या शोसाठी ओळखला जातो. आता तो 'रायसिंघानी व्हर्सेस रायसिंघानी'मध्ये दिसणार आहे. दुसरीकडे, निया आणि क्रिस्टलने 'एक हजारों में मेरी बहना है' या हिट शोमध्ये एकत्र काम केले होते. हा शो 2011 ते 2013 पर्यंत चालला. नंतर क्रिस्टल 'ब्रह्मराक्षस' आणि 'बेलन वाली बहू'मध्ये दिसली. सध्या निया शर्मा 'लाफ्टर शेफ'मध्ये दिसत आहे.