डॉली सोहीने जानेवारीमध्ये खुलासा केला होता की, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे तिला 'झनक' या मालिकेच्या शूटिंगमधून ब्रेक घ्यावा लागला होता. डॉली आत्तापर्यंत अनेक मालिकांचा भाग होती. 'भाभी', 'कलश', 'मेरी आशिकी तुम से ही', 'खूब लडी मर्दानी' आणि 'झांसी की रानी' सारख्या शोमध्ये तिने काम करून लोकांमध्ये ओळख मिळवली होती.
डॉलीने तिच्या जवळपास 2 दशकांच्या कारकिर्दीत 'कलश' आणि 'हिटलर दीदी' सारख्या अनेक लोकप्रिय टीव्ही शोचा भाग केला आहे . प्रकृतीच्या समस्येमुळे तिला केमोथेरपी घेतल्यानंतर बराच काळ शूटिंग करता न आल्याने तिला झनक शो सोडावा लागला होता.अभिनेत्रीने कॅनडास्थित एनआरआय अवनीत धनोआशी लग्न केले होते, परंतु, जेव्हा ती आई बनली तेव्हा त्यांच्यात तणाव वाढू लागला. डॉलीला एक मुलगी आहे.