दीप्ती नवल यांच्याकडे मागितली ४ लाखांची खंडणी

शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018 (15:45 IST)
ज्येष्ठ अभिनेत्री दीप्ती नवल यांना एका ई-मेलद्वारे सुमारे ४ लाख रूपयांची खंडणी मागितली गेली आहे. याबाबत दीप्ती नवल यांनी पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान ट्रॅश मेलमधील अशा धमकींच्या ई-मेलला काहीही अर्थ नाही, त्याकडे दुर्लक्ष करायला हवे, असे पोलिसांनी म्हटले आहे.
 
सायबर सेलमध्ये मदतीने हा ई-मेल कोणत्या सर्व्हरवरून पाठवला गेला होता, याचा पोलिस शोध घेत आहेत. साईबर क्राईम एक्सपर्ट रितेश भाटिया यांनाही गत २५ जूनला असाच एक ई-मेल आला होता. यात ३००० बिटकॉईन मागितले गेले होते. मात्र रितेश भाटिया यांनी या ई-मेलकडे दुर्लक्ष केले. कारण हा मेल बनावट असल्याचे त्यांना माहित होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती