काय घडले?
अभिनेता रजत बेदी स्वतः कार चालवत होता. रस्ता पार करत असलेले राजेश धूत यांना त्याच्या कारने जोरदार धडक दिली. नंतर रजत बेदीने स्वतः धूत यांना जवळच्या कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते कूपर हॉस्पिटलमध्ये पोहोचले. मात्र रजत बेदी तिथून निघून गेला होता.