‘सीआयडी’ निर्मात्याच्या घरी चोरी

मंगळवार, 23 मे 2017 (11:54 IST)

टेलिव्हिजनवर गाजलेली मालिका ‘सीआयडी’ चा निर्माता प्रदीप उप्पूर यांच्या घरी चोरी झाली आहे. शुक्रवारी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीये. प्रदीप यांच्या घरातून १२ लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे. कपाटातून पैसे आणि दागिने गायब झाल्याचे सर्वप्रथम प्रदीपच्या पत्नी वीणा यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी लगेचच पोलिसांकडे जाऊन चोरीची तक्रार दाखल केली. ही घटना ज्या बिल्डिंगमध्ये घडली तेथे महेश भट्ट यांच्यासारखे सेलिब्रिटीदेखील राहतात.

 

वेबदुनिया वर वाचा