Box office Collection: 'द काश्मीर फाइल्स'ने सर्व रेकॉर्ड मोडले, केली मोठी कमाई

सोमवार, 14 मार्च 2022 (12:53 IST)
अनुपम खेर यांचा द काश्मीर फाईल्स थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन तीन दिवस झाले आहेत. या तीन दिवसांत या चित्रपटाने दमदार कामगिरी केली असून   रिलीजच्या दुसऱ्याच दिवशी 'द काश्मीर फाइल्स'ला सुपरहिटचा किताब मिळाला आहे.
 
 विवेक अग्निहोत्रीच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी दमदार कामगिरी केली आणि अपेक्षेपेक्षा 3.35 कोटींची कमाई केली. तोपर्यंत हा चित्रपट केवळ 700 स्क्रीनवर प्रदर्शित झाला असला तरी प्रेक्षकांच्या मागणीमुळे त्याची स्क्रीन 2000 पर्यंत वाढवण्यात आली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या चित्रपटाचे बजेटच 14 कोटी आहे. चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 8.25 कोटी आणि तिसऱ्या दिवशी रेकॉर्डब्रेक 14 कोटींचा गल्ला जमवला आहे.
 
या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत 25.5 कोटींचा गल्ला जमवला आहे. चित्रपटाची कमाई अशीच राहिली तर लवकरच तो १०० कोटींचा आकडा गाठेल. विवेक अग्निहोत्रीच्या चित्रपटाच्या कथेत खूप ताकद आहे. या चित्रपटात ९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांच्या बेघर होण्याची कहाणी दाखवण्यात आली आहे. "द कश्मीर फाइल्स" हा स्क्रिप्ट आणि कथेच्या कलेला नवीन उंचीवर नेणारा चित्रपट आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती