अभिनेता पुलकित सम्राट आणि अभिनेत्री क्रिती खरबंदा लग्नबंधनात अडकले. या जोडप्याने शुक्रवारी १५ मार्च रोजी मानेसरमध्ये लग्नगाठ बांधली. लग्नासाठी पुलकितने या खास दिवसासाठी ऑलिव्ह ग्रीन रंगाची शेरवानी परिधान केली होती. तर क्रितीने बेबी पिंक रंगाचा लेहेंगा निवडला होता. पुलकितच्या शेरवानीची विशेष म्हणजे यावर संस्कृतमध्ये मंत्र लिहिलेले आहे.
अभिनेता पुलकित सम्राट आणि अभिनेत्री क्रिती खरबंदा यांच्यावर त्यांचे चाहते तसेच बॉलीवूड सेलिब्रिटी शुभेच्छांचा वर्षाव केला. लग्नानंतर दोघेही नवीन आयुष्याची सुरुवात करत आहेत. मागच्या काही वर्षांपासून पुलकित आणि क्रिती एकमेकांना डेट करत होते. दोघांनी काही दिवसांपूर्वीच मार्चमध्ये लग्न करणार असल्याचे संकेत फोटो शेयर करत दिले होते. तसेच दोघांनी मानेसरमध्ये कुटुंबीय व जवळच्या लोकांच्या उपस्थितीत १५ मार्च रोजी लग्नगाठ बांधली.