जोधपूरच्या कोर्टाने सलमानला सुनावले

अभिनेता सलमान खानला काळवीट शिकारप्रकरणी जोधपूरच्या कोर्टाने चांगलेच खडेबोल सुनावले. पुढील सुनावणीवेळी जर कोर्टात हजेरी लावली नाही तर जामीन रद्द करण्यात येईल अशा कडक शब्दांत सुनावले आहे.

याप्रकरणी मागील वर्षी ५ एप्रिल रोजी जोधपूर सेशन कोर्टाचे मुख्य न्यायाधीश देवकुमार खत्री यांनी काळवीट शिकारप्रकरणी सलमान खानला दोषी ठरवले होते. याप्ररणी पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्याचबरोबर सलमानवर १० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता. तसेच या घटनेतील  इतर आरोपी असलेले  सैफ अली खान, नीलम, तब्बू , सोनाली बेंद्रे आणि दुष्यंत सिंह यांना निर्दोष मुक्त केले होते.
 
सत्र न्‍यायालयाच्‍या या निर्णयाविरोधात सलमान खानने जिल्हा आणि सेशन कोर्टात अपील केली होते. ७ एप्रिलला जिल्हा आणि सेशन कोर्टाने सलमानविरोधात सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती देत त्याला सशर्त जामीन मंजूर केला होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती