Bhupinder Singh Funeral: ज्येष्ठ गायक भूपिंदर सिंग पंचतत्वात विलीन

मंगळवार, 19 जुलै 2022 (12:35 IST)
ज्येष्ठ पार्श्वगायक भूपिंदर सिंग यांचे मुंबईत निधन झाले. त्यांची पत्नी आणि गायिका मिताली सिंग यांनी महान गायकाच्या निधनाची माहिती दिली.सोमवारी संध्याकाळी गायक यांच्या निधनाबद्दल माहिती देताना त्यांची पत्नी मिताली म्हणाली की, "ते काही दिवसांपासून अनेक आरोग्य समस्यांनी त्रस्त होते". त्यांचे निधन हृदय विकाराच्या झटक्याने झाले. गायकावर रात्री जवळच्या लोकांच्या उपस्थितीत मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे, मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
वयाच्या 82 व्या वर्षी गायकाने अखेरचा श्वास घेतला.भूपिंदर सिंग हे बॉलिवूडमधील त्यांच्या अनेक प्रसिद्ध गाण्यांसाठी ओळखले जातात. “मौसम”, “सत्ते पे सत्ता”, “आहिस्ता आहिस्ता”, “दूरियाँ”, “हकीकत” आणि इतर अनेक चित्रपटांतील गाण्यांना त्यांनी आपला आवाज दिला. 
 
भूपेंद्र सिंह यांचा जन्म 6 फेब्रुवारी 1940 रोजी अमृतसर, पंजाब येथे झाला. त्यांचे वडील प्रोफेसर नाथा सिंग हे देखील उत्तम संगीतकार होते. 1978 मध्ये प्रदर्शित झालेल्या गुलजार यांनी लिहिलेल्या 'वो जो शहर था' या गाण्याने त्यांना लोकप्रियता मिळाली. भूपेंद्र यांनी 1980 मध्ये बंगाली गायिका मिताली मुखर्जीसोबत लग्न केले. मात्र, दोघांना मूलबाळ नाही. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गायक यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती