भारती सिंह म्हणाल्या, बर्याच वेळा कार्यक्रमाचे संयोजक वाईट वागणूक देत होते.ते माझ्या पाठीवर हात ठेवायचे. जे मला अजिबात आवडत नसायचे,परंतु नंतर मला वाटायचे की ते तर माझ्या साठी अंकलप्रमाणे आहेत तर मग ते माझ्याशी चुकीचे का वागतील ?
ती म्हणाली, त्यावेळी मला या सर्व गोष्टी समजत नसायचा.आता माझ्यात संघर्ष करण्याचा आत्मविश्वास आला आहे, जो यापूर्वी कधीही नव्हता.आता मी म्हणू शकते की काय समस्या आहे,आपण काय बघत आहात, बाहेर जा आम्हाला कपडे बदलायचे आहेत.पण त्यावेळी हे असं म्हणायची माझ्यात हिम्मत नव्हती.
भारतीसिंग तिच्या बालपणीच्या कठीण टप्प्याबद्दलही बोलली. भारती म्हणाली,मी पाहिले आहे की काही लोक घरात कसे यायचे आणि त्यांनी दिलेल्या कर्जाचे पैसे मागायचे.तर ते अगदी माझ्या आईचा हात देखील धरायचे.हे मला त्यावेळी माहित नव्हते की ते लोकं त्यांच्याशी वाईट वागत आहे.