विद्या बालनच्या आगामी ‘बेगम जान’ या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाला आहे‘. बेगम जान’मध्ये विद्या पंजाब येथील कुंटणखान्याच्या मालकिणीची भूमिका साकारत आहे. फाळणीच्या काळातला, पूर्णत: ऐतिहासिक असा हा चित्रपट आहे.
‘बेगम जान’चा पहिला पोस्टर ट्विट करत विद्याने लिहलय की, ‘मी येतेय.’ याचसोबत तिने BegumJaanFirstLook हा हॅशटॅग दिला आहे. केवळ विद्याच नाही तर अभिनेत्री गौहर खानदेखील या चित्रपटात झळकणार आहे.