‘बागी २’ ची रेकॉर्ड ब्रेक कमाई , 'पद्मावत' ला मागे टाकले

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘बागी २’ सिनेमाने अक्षय कुमारचा पॅडमॅन आणि रणवीर सिंगच्या पद्मावत सिनेमाला पहिल्या दिवसाच्या कमाईत केव्हाच मागे टाकले आहे. ‘बागी २’ ने शुक्रवारी भारतात २५.१० कोटींची कमाई केली. बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी एवढी कमाई करणारा हा या वर्षातला आतापर्यंतचा पहिलाच सिनेमा ठरला आहे.
 
सिनेव्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत म्हटले की, ‘बागी २’ सिनेमा खऱ्या अर्थाने डोळे उघडणारा सिनेमा ठरला. या सिनेमाने आतापर्यंत तरी पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई केली आहे. पद्मावत सिनेमालाही ‘बागी २’ ने मागे टाकले.
 
२०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बागी’ या सिनेमाचा हा सिक्वल आहे. यामध्ये बॉलिवूडची बहुचर्चित दिशा- टायगरची जोडी आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती