'एवेंजर्स ऍड गेम'चा धमाका, पहिल्या दिवशी चीनमध्ये 750 कोटी रुपयांचे कलेक्शन

गुरूवार, 25 एप्रिल 2019 (14:50 IST)
एवेंजर्स एंड गेमचा पूर्ण जग भरात आतुरतेने वाट बघण्यात येत होती. चित्रपटाची जबरदस्त एडवांस बुकिंग झाली आहे आणि असे मानले जात आहे की हे चित्रपट कमाईचे नवीन रेकॉर्ड्स बनवले.
 
भारतात हे चित्रपट 26 एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे, पण काही देशांमध्ये 24 एप्रिल रोजी रिलीज झाले आहे ज्यात चीन देखील सामील आहे.
 
चीनमध्ये पहिल्याच दिवशी या चित्रपटाने धमाका केला आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी किमान 750 कोटी रुपयांचे कलेक्शन बॉक्स ऑफिसवर केले आहे. हे आशियातील देशात कुठल्याही चित्रपटाची सर्वात मोठी सुरुवात आहे.
चीनमध्ये प्रत्येक 15 मिनिटात या चित्रपटाचा शो चालत आहे आणि प्रेक्षकांमध्ये तिकिटांसाठी मारामारी सुरू आहे. एडवांस बुकिंग देखील जरबदस्त आहे आणि येणार्‍या दिवसांमध्ये हे चित्रपट अजून पुढे जाणार आहे अशी आशंका व्यक्त करण्यात येत आहे.

भारतात देखील एवेंजर्स ऍड गेमचा जबरदस्त क्रेझ आहे. तिकिट रेट महाग केले असले तरी प्रेक्षकांच्या उत्साहात कुठल्याही प्रकारचा प्रभाव पडलेला नाही आहे. भारतात पहिल्या दिवशीचे कलेक्शन 35 कोटी रुपयांपेक्षा जास्त राहण्याची अपेक्षा आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती