एवेंजर्सची भारतात क्रेझ

शनिवार, 27 एप्रिल 2019 (10:19 IST)
जगभरात एवेंजर्स एंडगेम या हॉलिवूडपटाने धूमाकुळ घातला असतांना आज तो भारतात रिलीज झाला. या चित्रपटाने जगभरात एका दिवसात ११८६ कोटींची कोटी रूपयांची घसघशीत कमाई केली आहे. एवेंजर्सची भारतात गजब क्रेझ आहे. सर्व शो आधीच बुक झाले आहेत. या चित्रपटाची डिमांड इतकी आहे की, यासाठी सर्व चित्रपटगृहे २४ तास सुरू आहेत. भारतात हा चित्रपट इंग्लिश, हिंदी, तेलुगु आणि तमिळ भाषामध्‍ये रिलीज झाला.
 
ॲव्हेंजर्स एंडगेम मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा सर्वात मोठा चित्रपट आहे. हा चित्रपट पाहताना तीन तासांचा वेळदेखील कमी पडतो. या चित्रपटाची कल्पना २००८ साली मार्व्हलचे प्रणेता स्टॅन ली यांनी मांडली होती. पुढे तब्बल २१ चित्रपटांची साखळी त्‍यांनी मोठ्‍या पडद्‍यावर आणली. ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ हा ‘अ‍ॅव्हेंजर्स इन्फिनीटी वॉर’चा दुसरा भाग आहे. एवेंजर्सच्‍या या चित्रपटामध्‍ये मार्वेलचे सर्व २२ वेगवेगळ्‍या भूमिका आहेत. कॅप्टन अमेरिका, थॉर, हल्क, कॅप्टन मार्व्हल, ब्लॅक व्हिडो, रॉकेट, नेब्यूला हे सुपरहिरो यामध्‍ये दिसत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती