बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचा नुकताच 'कौन बनेगा करोडपती 14' या क्विझ शोच्या सेटवर अपघात झाला. त्यामुळे त्याच्या पायाची नस कापली गेली. अमिताभ बच्चन यांच्या पायाला यामुळे खूप त्रास झाला. याचा खुलासा खुद्द बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये केला आहे. त्यांनी सांगितले की, सेटवर त्यांच्या पाय कापल्यामुळे त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये सांगितले की, दुखापतीनंतर त्यांच्या पायाला काही टाके पडले आहेत. मात्र, आनंदाची बातमी म्हणजे बिग बी आता पूर्णपणे निरोगी आहेत. अमिताभ बच्चन यांनीच चाहत्यांना सांगितले आहे की, आता ते पूर्णपणे बरे आहेत आणि आता काळजी करण्यासारखे काही नाही.
अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, धातूच्या धारदार वस्तूने त्यांच्या डाव्या पायाचा मागील भाग कापला, त्यानंतर रक्तस्त्राव सुरू झाला. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, त्यानंतर त्यांच्या पायाला टाके पडले. अमिताभ बच्चन यांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असली तरी डॉक्टरांनी त्यांना सध्या विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.