South Film Industry News: अभिनेता अल्लू अर्जुन यांनी संध्या थिएटर दुर्घटनेत जखमी झालेल्या श्रीतेज या मुलाची हैदराबादच्या KIMS रुग्णालयात भेट घेतली. ही घटना 4 डिसेंबर 2024 रोजी अभिनेत्याच्या 'पुष्पा 2: द रुल' चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान घडली, परिणामी रेवती नावाच्या महिलेला आपला जीव गमवावा लागला आणि तिचा मुलगा श्री तेजची प्रकृती अजूनही गंभीर आहे.