अभिनेता अक्षय कुमार आज त्याचा ५८ वा वाढदिवस साजरा करत आहे. अक्षय कुमारचा जन्म ९ सप्टेंबर १९६७ रोजी पंजाबमधील अमृतसर येथे झाला. त्याचे खरे नाव राजीव हरिओम भाटिया आहे. अक्षय कुमार त्याच्या अॅक्शन चित्रपटांसाठी आणि दमदार पात्रांसाठी ओळखला जातो. पण एक काळ असा होता जेव्हा त्याला रीलमध्ये नाही तर खऱ्या आयुष्यात खऱ्या दरोडेखोरांना सामोरे जावे लागत असे. ही कहाणी स्वतः अक्षय कुमारने अनुपम खेर यांच्या चॅट शो 'कुछ भी हो सकता है' मध्ये शेअर केली होती, ज्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले.
अक्षय कुमारचा पहिला चित्रपट 'सौगंध' 1991 मध्ये रिलीज झाला होता, मात्र त्याला खरी ओळख 1992 मध्ये आलेल्या 'खिलाडी' चित्रपटातून मिळाली. तसेच अक्षयची सुरुवात ॲक्शनने झाली, पण नंतर त्याने कॉमेडीत स्वत:ला सिद्ध केले. हेरा फेरी, गरम मसाला, फिर हेरा फेरी, भागम भाग, आणि भूल भुलैया या चित्रपटांनी त्यांची प्रतिमा अष्टपैलू कलाकार म्हणून बदलली. अक्षय कुमारने एअरलिफ्ट, रुस्तम, टॉयलेट: एक प्रेम कथा, आणि पॅडमॅन यांसारख्या चित्रपटांमध्ये गंभीर आणि सामाजिक भूमिका साकारल्या, ज्यामुळे तो केवळ अभिनेता म्हणून नव्हे तर समाजाशी संबंधित कथा सांगणारा एक जबाबदार कलाकार म्हणूनही ओळखला गेला.