बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेल्या 'गदर 2' सिनेमानंतर ; सनी देओलच्या 'या' सिनेमाचं पोस्टर आऊट

मंगळवार, 22 ऑगस्ट 2023 (09:02 IST)
बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि अमीषा पटेल यांचा 'गदर 2' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत या सिनेमाने 350 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. अशातच आता अभिनेत्याच्या आगामी 'माँ तुझे सलाम 2' या सिनेमाचं पोस्टर आऊट झालं आहे.
 
 'माँ तुझे सलाम' हा सिनेमा 25 जानेवारी 2002 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात सनी देओल, तब्बू , अरबाज खान  आणि टिन्नू वर्मा मुख्य भूमिकेत होते. आता या सिनेमाचा दुसरा भाग अर्थात 'माँ तुझे सलाम 2' या सिनेमाचं पोस्टर आऊट करण्यात आलं आहे.  'माँ तुझे सलाम 2' या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सिनेविश्लेषक अतुल मोहन यांनी या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. पोस्टर शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,"दुध मांगोगे तो खीर देंगे, कश्मीर मांगोगो तो लाहौर भी छीन लेंगे". लवकरच थरार, नाट्य आणि अॅक्शनचा तडका असणाऱ्या या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.
 
सनी देओलचा 'गदर 2'   हा सिनेमा एकीकडे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अशातच अभिनेत्याच्या आगामी 'माँ तुझे सलाम 2' या सिनेमाचं पोस्टर आऊट करण्यात आलं आहे. 'माँ तुझे सलाम 2' हा सिनेमादेखील 500 कोटींचा टप्पा पार करणार असल्याचं म्हटलं जात आहे. अद्याप या सिनेमासंदर्भात अधिक माहिती समोर आलेली नाही.
 
देशभक्ति दाखवणाऱ्या या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला. आता 'गदर 2' सिनेमाला मिळालेलं यश लक्षात घेत 'माँ तुझे सलाम'चा सीक्वेल रिलीज करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला असल्याचं म्हटलं जात आहे. महेंद्र धारीवाल या सिनेमाची निर्मिती करणार असल्याचं पोस्टरमध्ये दिसत आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती