मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद 'क्रिश 4' चे दिग्दर्शन करू शकतात. हृतिक रोशन आणि सिद्धार्थ आनंद यांनी यापूर्वी अनेकदा एकत्र काम केले आहे. या दोघांनी 'बँग बँग', 'वॉर' आणि 'फाइटर'मध्ये काम केले होते. यातील 'वॉर' आणि 'फायटर' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवरही यशस्वी ठरले
हृतिक रोशन 2025 मध्ये 'क्रिश 4'चे शूटिंग सुरू करणार आहे. तो त्याचे वडील राकेश रोशन यांच्यासोबत चित्रपटाच्या कथेवर काम करत आहे. यावर्षीच्या उन्हाळ्यात ते पूर्ण करण्याचे नियोजन दोघांनी केल्याचे सांगण्यात आले. दोघांनाही या वर्षाच्या अखेरीस कथा फायनल करायची आहे. हृतिक रोशन सध्या 'वॉर 2' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
2003 मध्ये 'कोई मिल गया' या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. त्यात हृतिक आणि प्रिती झिंटा मुख्य भूमिकेत होते. 2006 मध्ये रिलीज झालेल्या 'क्रिश' नावाच्या दुसऱ्या भागाचे नाव होते. यामध्ये प्रिती झिंटाच्या ऐवजी प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत होती. 'क्रिश 3' चित्रपटाचा तिसरा भाग 2013 मध्ये बऱ्याच वर्षांनी प्रदर्शित झाला होता.