बॉलीवूडचे 3 कलाकार अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण यांच्यावर पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे अनेकांनी टीका केली.आता शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अजय देवगण यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने नोटीस बजावली आहे. पान मसाला कंपन्यांच्या जाहिराती प्रकरणी या तिघांना ही नोटीस बजावण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या वकिलाने लखनौ खंडपीठाला सांगितले की, या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातही सुनावणी सुरू आहे. या कारणास्तव ही याचिका फेटाळण्यात यावी. न्यायमूर्ती राजेश सिंह चौहान यांच्या एकल खंडपीठाने ही अवमान याचिका मंजूर केली असून पुढील सुनावणीची तारीख 9 मे 2024 देण्यात आली आहे. न्यायमूर्ती राजेश सिंह चौहान यांच्या खंडपीठाने यापूर्वी केंद्र सरकारला याचिकाकर्त्यांच्या बाजूने निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. या कलाकारांवर कारवाई व्हायला हवी, असा युक्तिवाद करण्यात आला.
सुनावणीदरम्यान केंद्र सरकारच्या वतीने डेप्युटी सॉलिसिटर जनरल एसबी पांडे यांनी सांगितले की, याप्रकरणी केंद्राने अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.