कुवेतमध्ये सामीचा अपमान, स्टाफला म्हटले इंडियन डॉग्स

कुवेतमध्ये भारतीय गायक अदनान सामी यांच्यासोबत गैरवर्तन करण्यात आले. अदनान यांनी याबाबत ट्विट केले आहे. अदनान साम यांनी कुवेतमध्ये भारतीय दूतावासाला टॅग करत ट्विट केले की आपल्या शहरात प्रेमाने आलो होतो परंतू आम्हाला अशी वागणूक मिळत आहे.
 
आपण आमची मदत केली नाही. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना ही गोष्ट कळताक्षणी त्या अॅक्शनमध्ये आल्या आणि त्यांनी अदनान यांच्याशी चर्चा केली. अदनान सामी यांच्या ट्विट केल्यानंतर राज्य गृह मंत्री किरण रिजेजू ने लिहिले की आपल्याला अपमानजनक स्थितीला समोरा जावं लागले त्यासाठी मी क्षमाप्रार्थी आहे. सुषमा स्वराज आपल्या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे आणि आपण त्यांच्याशी संपर्क करू शकता.
 
अदनान यांनी ट्विट केले होते की कुवेती एयरपोर्ट इमिग्रेशनच्या लोकांनी माझ्या स्टाफला परेशान केले. त्यांना इंडियन डॉग्स असे म्हटले. कुवेती लोकांची अशी वागणुकीची हिंमत झाली तरी कशी. उल्लेखनीय आहे की अदनान सामी आपल्या टीमसोबत शो करण्यासाठी कुवेत गेले असून त्यांनी येथील काही फोटोदेखील ट्विट केले होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती