सुशांत एक चांगला आणि प्रतिभावान मुलगा होता. त्याच्या निधनानंतर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी फक्त 20 लोकांना येण्याची परवानगी देण्यात आली होती. मी त्या 20 पैकी एक होतो. मी त्याच्या वडिलांना रडताना पहिले आहे. सुशांतला शांत निजलेला पाहून मी फक्त एवढा विचार करत होतो .की मित्र बघ तुझ्या आयुष्यातून अशा पद्द्धतीने निघून जाण्याने तुझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची काय अवस्था झाली आहे. हे तुला समजलं असत तर कदाचित तू असे केले नसते.