Ranbir Kapoor ED Sumons: ऑनलाइन गेमिंग प्रकरणात अभिनेता रणबीर कपूरला ईडीचे समन

बुधवार, 4 ऑक्टोबर 2023 (16:16 IST)
Ranbir Kapoor ED Sumons: बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूर त्याच्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. मात्र सध्या रणबीरचे नाव वादांच्या भोवऱ्यात सापडले आहे. देशाच्या अंमलबजावणी संचालनालय ईडीने ब्रह्मास्त्र चित्रपटातील कलाकार रणबीरला समन्स पाठवल्याचे वृत्त आहे. ऑनलाइन गेमिंगबाबत ईडीने अभिनेत्यावर कारवाई केली आहे. 

दमदार चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा रणबीर कपूर सर्वांचा लाडका मानला जातो. पण ऑनलाइन गेमिंग अॅपमध्ये अभिनेत्याचे नाव अडकत असल्याची बातमी समोर येताच खळबळ उडाली.

अभिनेता रणबीर कपूरला अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने समन्स पाठवले आहे. महादेव ऑनलाइन गेमिंग अॅपमुळे रणबीरचे नाव अडचणीत आले आहे. याप्रकरणी ईडीने 6 ऑक्टोबरला चौकशीसाठी बोलावले आहे.

'महादेव बुक' ऑनलाइन बेटिंग अॅप प्रकरणात रणबीर कपूरच्या अडचणी वाढू शकतात. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अभिनेत्याला चौकशीसाठी समन्स बजावले आहे. ईडीने कोलकाता, भोपाळ, मुंबईसह 39 शहरांमध्ये महादेव या ऑनलाईन अॅपशी जोडलेल्या मनी लॉन्ड्रिंग नेटवर्कच्या विरोधात ही कारवाई केली होती.

सट्टेबाजीचा पैसा शेअर बाजारात वापरल्याचेही ईडीच्या तपासात उघड झाले आहे. इतकंच नाही तर या प्रकरणाशी 14 फिल्म स्टार्सचीही नावे जोडली गेली आहेत. या ऑनलाइन बेटिंग अॅपमुळे 17 बॉलिवूड स्टार ईडीच्या रडारवर आहेत. बेकायदेशीर सट्टेबाजीच्या या प्रकरणात ईडीने आता मोठे पाऊल उचलले असून सेलिब्रिटींना समन्स पाठवण्यास सुरुवात केली आहे. जिथे पहिले नाव रणबीर कपूरचे आहे.
 





Edited by - Priya Dixit 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती