आता अभिषेक बच्चन या वयातही आई-वडिलांसोबत राहत असल्याचं म्हणत एका यूझरमुळे ट्रोल झाला. 'तुमच्या आयुष्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका. लक्षात ठेवा, अभिषेक बच्चन अजूनही आपल्या पालकांसोबत राहतो.' असं ट्वीट एका व्यक्तीने ट्विटरवर केलं. दरवेळीप्रमाणे अभिषेकने या ट्रोलरलाही शिंगावर घेतलं. 'हो, मी माझ्या पालकांसोबत राहतो. त्यांच्यासोबत राहण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे' असं उत्तर अभिषेकने ट्रोलरला दिलं.