आमिर खानचा लाल सिंह चड्ढा वादाच्या भोवऱ्यात

मंगळवार, 13 जुलै 2021 (12:42 IST)
सध्या आमिर खान चर्चेत आहे. काही दिवसापूर्वी त्याचे दुसरे घटस्फोट झाल्यामुळे त्याची देखील चर्चा बरीच रंगली होती.आता त्याच्या एका नवीन चर्चेला उधाण आले आहेत.आणि या मध्ये आमिरखान प्रॉडक्शन मध्ये बनलेला अतुल कुलकर्णी ने लिहिलेला,अद्वैत चंदन दिगदर्शित 'लालसिंह चड्डा' हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.  
 
आमिरच्या लाल सिंह चड्ढा या चित्रपटाचे शूटिंग सध्या लडाख मध्ये सुरु आहे.
या चित्रपटामुळे लडाख मध्ये खूप प्रदूषण होत असल्याचा आरोप तिथल्या नागरिकांनी केल्यामुळे हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.या चित्रटपतात आमिर खान आणि करीना कपूर खान मुख्य भूमिकेत आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती