मंदिरा बेदी 49 वर्षांची झाली तरी आपल्या फिटनेसची काळजी घेते. आपल्या फिटनेस वर्कआऊटचे फोटो, व्हिडिओ ती सोशल मीडियावर अपलोड करत असते. तसाच एक व्हिडिओ तिने पोस्ट केला आहे. त्यात ती जीममध्ये वर्कआऊट करताना दिसते आहे. यामध्ये ती बॅक बेंड योगा म्हणजेच धनुरासन करताना दिसते आहे. तिच्या या लवचिक आसन करण्यावर तिच्या फॅन्सनी कॉमेंटही केल्या आहेत. एकाने माझी ऑक्सिजन लेव्हल वाढली. अशी कॉमेंट केली आहे. आणखी एकाने सुपरफिट तर दुसर्याने परफेक्ट म्हणून मंदिराचे कौतुक केले आहे.