70 कोटी ग्रँड कमाई

द्विअर्थी विनोद, आक्षेपार्ह हावभाव आणि अर्वाच्य संवादांमुळे समीक्षकांनी झोडपून काढल्यानंतरही ‘ग्रँड मस्ती’ला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. या चित्रपटाने केवळ आठ दिवसांत 70 कोटींची कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट शंभर कोटी क्लबमध्ये दाखल होईल, असे जाणकारांचे मत आहे. दिग्दर्शक इंद्रकुमार यांनी 2004 मध्ये रितेश देशमुख, आफताब शिवदासानी आणि विवेक ओबरॉय यांना घेऊन ‘मस्ती’ हा चित्रपट केला होता.

WD


त्यावेळी नर्मविनोद आणि चांगल्या गाण्यांमुळे बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. दोन वर्षापूर्वी कुमार यांनी पुन्हा सिक्वेलची घोषणा केली होती. यात तिन्ही अभिनेत्यांना कायम ठेवण्यात आले. मात्र, अभिनेत्रींच्या संख्येत वाढ करून यात तब्बल सहा जणींना घेण्यात आले. सोनाली कुलकर्णी, मंजिरी फडणीस, करिश्मा ताना, मरियम झकेरिया, ब्रुना अल्लाद्दीन, किनत अरोरा यांना चित्रपटात साइन करण्यात आले. 13 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर चित्रपटावर अनेक समीक्षकांनी चांगलेच तोंडसुख घेतले. मात्र, या चित्रपटाने पहिल्या आठवडय़ात 66 कोटींचा व्यवसाय केला, तर शनिवारी यात आणखी 4 कोटींची भर टाकत हा आकडा 70 कोटींच्या घरात जाऊन पोहोचला.

वेबदुनिया वर वाचा