24 सीझन टूची जुलैत सुरुवात

शनिवार, 11 जून 2016 (12:05 IST)
तीन वर्षापूर्वी प्रचंड लोकप्रिय ठरलेला अनिल कपूरचा 24 या अँक्शनपॅक्ड शोचा दुसरा सीझन कलर्स वाहिनीवर जुलैमध्ये प्रसारित केला जाणार असून त्याचे ट्रेलर बुधवारी सादर करण्यात आले. या कार्यक्रमाला सोनम कपूर व आमिर खान उपस्थित होते. अनिल कपूरने 24 च्या दुसर्‍या सीझनसाठी प्रेक्षकांना ङ्खार मोठी प्रतीक्षा करावी लागल्याचे सांगितले मात्र तिसरा सीझन लवकर येईल असे आश्वासनही दिले आहे. अमेरिकन टीव्ही शोवरून प्रेरणा घेऊन ही सिरियल बनविली गेली आहे. पहिल्या भागात अनिल कपूरने दहशतवादविरोधी पथकातील एजंट जयसिंह राठोड ही भूमिका साकारली आहे.
 
कलर्सचे सीईओ राज नायक म्हणाले, पहिली मालिका 2013 मध्ये आली व ती प्रचंड लोकप्रिय झाली. आता दुसरा भाग येत आहे. त्याला कसा प्रतिसाद मिळतो ते पाहून सीझन तीन कधी सुरू करायचा याचा निर्णय घेतला जाईल. दुसर्‍या सीझनमध्ये मुंबईवर जीवघेण्या व्हायरसचे आक्रमण होते व ते मिशन कसे हाताळले जाते हे दाखविले जाणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा